Ad will apear here
Next
वीर सेवा दलातर्फे पशुसंवर्धन आयुक्तांची भेट
कोल्हापूर : येथील वीर सेवा दल जिल्हा व तालुका समितीतर्फे पशु संवर्धनाच्या विविध समस्यांसंदर्भात पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांची भेट घेऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली.

गीर गोवंशाच्या ‘सिमेन’चा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याने या भेटीत ती मागणी प्रामुख्याने करण्यात आली. पशू आहार, पशूंचे विविध आजार, औषधे, त्यावरील उपचार, शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या आदींबाबत आयुक्त कांतिलाल उमाप यांच्याशी चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान पशुसंवर्धन विभागाचे पारेकर, अभिनव फार्म्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके, जिल्हा प्रमुख अजित पाटील, जिल्हा सचिव विजय बरगाले, जिल्हा सदस्य अनिल गडकरी, समोशरण भोकरे, शिरोळ तालुकाप्रमुख संतोष मगदूम, हातकणंगले तालुका सचिव आशिष देसाई आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZXABF
Similar Posts
कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज आणि ‘दी आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, ‘बी. व्होक. अँड कम्युनिटी कॉलेज’चे समन्वयक सतीश गायकवाड, प्रमुख पाहुण्या अक्षया बोरकर, अॅडव्होकेट गौरी भावे,
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत विजेते पुणे : सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्सतर्फे (एसएई इंडिया) ‘सेल्फ प्रॉपेल्ड ओनियन हार्वेस्टर’ निर्मितीची ‘एसएई तिफण २०१९’ ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी गौरविण्यात आले
गणेशमूर्तींवरील जीएसटी हटविण्याची मागणी मुंबई : लोकसभेत २८ जुलै रोजी झालेल्या कामकाजात खासदार धनंजय महाडिक यांनी, गणेशमूर्तीवर आकारण्यात आलेल्या ‘जीएसटी’ला जोरदार विरोध दर्शवला. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत खासदार महाडिक म्हणाले, ‘कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते. तसेच संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो
‘टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात’ पुणे : ‘या वर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. टंचाई निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language